मंडणगड पं. स. सदस्य म्हामुणकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप

0

मंडणगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांनी तालुक्यातील दहा गावांत भाजीपाला व फळलागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या बी-बियाण्यांचे वाटप केले.

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दुबार पीक घेण्याची गोडी निर्माण होण्याकरिता बामणघर, कुंबळे, दुधेरे, पिंपळगाव, लाटवण, भोळवली, कादवण, माह, शेडवई, जांभुळनगर या गावात भाजीपाला बियाण्यांचे वाटप केले. पिंपळगाव येथे यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नितीन म्हामणकर, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे किट तयार करून त्यांचे वाटप केले. शेतकऱ्यांच्या अर्थकारणास शेतीच्या माध्यमातून गती मिळावी या उद्देशाने विविध भाज्यांचा समावेश असलेले ५८५ रुपये किमतीचे किट बनविले आहे. त्याचे दहा गावांतील १०० लाभार्थ्यांना वाटप केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 23-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here