रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे ‘पुनर्जन्म मिथ्य की तथ्य’ या विषयावर ठाणे येथील प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ, संगीत संशोधक डॉ. विद्याधर ओक यांचे व्याख्यान होणार आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच उद्या (दि. २५ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हे व्याख्यान होईल. या कार्यक्रमात डॉ. ओक पुनर्जन्माबाबत विस्तृत माहिती देणार असून, जागतिक संशोधनाचा आढावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेक प्रतिथयश भारतीयांचे संभाव्य पूर्वजन्म याविषयी स्लाइड शोद्वारे माहिती देणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
