अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा अखेर भारताने मिळवला ताबा!

0

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा अखेर ताबा भारताला मिळाला आहे. खंडणी आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत १५ वर्षांपासून तो पोलिसांना पाहिजे होता. पुजारी याच्याविरुद्ध खंडणी आणि हत्यांसह २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड आणि दहशतवाद्यांचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात दाऊद इब्राहिम टोळीसाठी पुजारी एकेकाळी काम करत होता. मात्र, नंतर तो फरार झाला. दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारी याला सोमवारी पहाटेपर्यंत भारतात आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज कर्नाटक पोलिसांना पुजारीचा ताबा मिळाला आहे. केरळ, मंगळुरू, अहमदाबाद पोलिसांप्रमाणेच मुंबई पोलिसांनाही त्याचा ताबा पाहिजे आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती. मुंबईसह महाराष्ट्रात त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न व खंडणीसह ५६ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यासाठी मुंबई पोलिसांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईतील वकील शाहिद आझमी हत्येचा देखील गुन्हा पुजारीविरोधात आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here