स्वतःची किंमत वाढवण्यासाठी पडळकरांची अजित पवारांवर टीका : धनंजय मुंडे

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, अशी घणाघाती टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:31 PM 23-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here