काजरघाटी मार्गावर अपघात !

0

रत्नागिरी काजरघाटी येथे उतारात ब्रेक फेल होऊन डंपर पलटी झाला. रहदारीच्या या रस्त्यावर उतारात रस्त्याचे काम देखील सुरू होते. हा डंपर मोठ मोठे दगड घेऊन सोमेश्वर येथे चालला होता. उतारात ब्रेक फेल झाल्यावर चालकाने समोर असणाऱ्या माणसांना ओरडून सांगितल्याने सर्वजण सावध झाले. समोरून येणाऱ्या काही दुचाकी चालकांनी रस्त्यावरून खाली उड्या घेतल्या. रस्त्याचे काम करणारे कामगार सुरक्षित ठिकाणी पळाले. डंपर चालकाने वेळीच सावध केल्याने अनेकांचे प्राण वाचले. या अपघातात दोन दुचाकींचे नुकसान झाले असून डंपर चालक जखमी झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here