चिपळूणमधील जवानाचे अपघाती निधन

0

चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दचे सुपुत्र व भारतीय सैन्यात मध्य प्रदेशमध्ये कमांडो म्हणून कार्यरत असलेले विशाल रघुनाथ कडव (वय ३५) यांचे रविवारी (दि.२३) सायंकाळी अपघाती निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील सागर शहरात दुचाकी व डंपरच्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पिंपळी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here