गुहागर तालुक्यात कोरोना महामारीत दीड वर्षात १६४ जणांचा मृत्यू

0

शृंगारतळी : गेली दीड वर्षापेक्षा अधिक काळ संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. गुहागर तालुक्यातील एकूण १६४ जणांना दीड वर्षात कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या गुहागर तालुक्यातील १६४ जणांपैकी शासनाच्या सानुग्रह अनुदानासाठी केवळ १६ जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे समजते. त्यामुळे इतरांच्या नातेवाईकांनीही पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

गुहागर तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे कटू सत्य पुढे आले आहे. गुहागर तालुक्यात यावेळी तात्पुरत्या उभारलेल्या कोव्हिड सेंटर व त्याशिवाय खासगी हॉस्पिटल, गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, कामथे व रत्नागिरी येथील हॉस्पिटल, चिपळूण व इतर शहरातील मोठी खासगी हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी गुहागर तालुक्यातील कोव्हिडची बाधा झालेल्यांना ठेवण्यात आले होते व तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. कोरोनाच्या महामारीत डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. रात्रं-दिवस रुग्णांसाठी मेहनत घेतली. अनेकांनी तब्बल महिना दीड महिने उपचार घेतले. काही जणांनी उपचारांवर लाखो रुपये खर्च केले, तरीही गुहागर तालुक्यातील १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे.

कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या गुहागर तालुक्यातील १६४ जणांपैकी शासनाच्या सानुग्रह अनुदानासाठी केवळ १६ जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे समजते. इतर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी तालुका आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावात ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनेजनजागती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती गुहागर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 24-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here