कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकरी पात्र

0

रत्नागिरी: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आजिवली (ता. राजापूर) आणि वहाळ (ता. चिपळूण) या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करण्यास सुरुवात करून या योजनेचा प्रारंभ दि. २४ फेब्रुवारीला करण्यात आला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १८ हजार ६२८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार आहेत. आजिक्ली व वहाळ येथील प्रत्येकी १५१ व ८४ अशा एकुण २३५ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे,असे जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here