जिल्हा रुग्णालयात विविध उपचारांसाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध

0

रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दर शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत विविध उपचारांसाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहणार आहेत. कोल्हापूरचे कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. अर्जुन आडनाईक, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. विजयकुमार विघ्ने हे दर शनिवारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी उपलब्ध असतील. शिवाय येत्या शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कोल्हापूरचे युरोलॉजिस्ट डॉ. प्रसाद मगदूम मोफत तपासणी करणार आहेत. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास ती रत्नागिरीतील संकल्प युनिक फाउंडेशनच्या जिल्हा रुग्णालयातील रुग्ण मदत केंद्रात कोऑर्डिनेटर अवंती नांदगावकर (८५३०१३१६६२) किंवा पत्रकार दत्ता महाडिक (९४२२६३७०१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संकल्प युनिक फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here