पाटपन्हाळे येथे उमेद अंतर्गत भाजीपाला प्रशिक्षण

0

गुहागर : तालुक्यातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे येथे उमेद अंतर्गत १० दिवसांच्या भाजीपाला प्रशिक्षणाची सुरुवात २३ डिसेंबरपासून झाली.

या प्रशिक्षणाच्या प्रथम सत्रात श्री. शिवाजी चव्हाण यांनी आहारातील भाजीपाल्याचे महत्व, त्यातून मिळणारे पोषणद्रव्ये व त्याचे रोजच्या जीवनात महत्व याबाबत सखोल माहिती दिली. द्वितीय सत्रामध्ये श्री. प्रतिक बांगर यांनी महिला शेतकऱ्यांना परसबागेतील भाजीपाला, यांत्रिकीकरण, गांडुळखत युनिट, फळबाग लागवड व व्यवस्थापण याबाबत मार्गदर्शन वया योजना घेण्याचे आवाहन केले. शेवटी झालेल्या सत्रावर प्रश्न विचारण्यात आले व योग्य उत्तर देणाऱ्या विजेत्यास बक्षिस वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीम. ओक, श्रीम. बोट व श्रीम. रावणंग यांसह तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या कृषिसखी व बचत गटाच्या शेतकरी महिला उपस्थित होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:58 PM 25-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here