मिस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी बुशरा सुवर्णदुर्गकरची जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड

0

रत्नागिरी : तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने पूज्य साने गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कथाकथन स्पर्धेमध्ये मिस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी बुशरा अब्दुल मुतल्लिब सुवर्णदुर्गकर, इयत्ता दहावीची विद्यार्थिनीने ‘हम सब एक हो जाये’ ही कथा उत्कृष्टरित्या सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच तिची चिपळूण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थिनीला प्रशालेचे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांचे मार्गदर्शन लाभले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. अब्दुल हमीद मिस्त्री, सचिव श्री. तनवीर मिस्त्री, सहसचिव श्री. जाहीर मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे खजिनदार श्री. निसार लाला, संस्थेचे पदाधिकारी शकील मजगावकर रफिक मुकादम, साबीर मजगावकर यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे आणि मार्गदर्शक शिक्षकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक इक्बाल हुनेरकर, पर्यवेक्षक मुश्ताक आगा यांनीही यशस्वी विद्यार्थिनीचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या वतीने प्प्रशालेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here