खेड रेल्वे स्थानकानजीक रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

0

खेड(प्रतिनिधी): कोकण रेल्वे मागावरून धावणा-या लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेस समोर एका ३७ वर्षीय तरुणाने स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्थानकानजीकच्या असलेल्या पुलानजीक घडली. या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. रघुनाथ अशोक गनर भिलार आयना बाद्धवाडी असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबईहून मॅगलोरच्या दिशेने जाणाच्या नेत्रावती एक्स्प्रेसखाली स्वत:ला झोकून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू ओढवला. ही बाब रेल्वे रुळावर गस्त घालणा-या कर्मचा-यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ स्टेशन मास्तर राकेश सिंह यांना माहिती दिली. छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह ओळखता येणे कठीण होते मात्र गमरे याच्या खिशात सापडलेल्या वाहन परवाना वरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, रघुनाथ गमरे हा शहरातील एका व्यापायाच्या दुकानातील टेम्पोवर चालक म्हणून कार्यरत होता. त्यास दोन मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here