रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोरून दुचाकी चोरीला

0

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील गिरीरत्न हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना बुधवार, २२ डिसेंबर रोजी घडली आहे.

याबाबत सुधीर शंकर मांडवकर (५२, रा. आम्रपाली कॉम्प्लेक्स निवखोल, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या ताब्यातील एच. एफ. डिलक्स (एमएच-०८-एयू-५२२९) रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील गिरीरत्न हॉटेलसमोर पार्क केली होती. ती अज्ञाताने लांबवली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here