चिपळूण नगर परिषदची आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

0

चिपळूण : वादग्रस्त वाढीव दराच्या निविदा आणि घनकचरा कराची रक्कम कमी केलेल्या ठरावाविरोधात माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी दाखल केलेल्या अधिनियमातील तरतुदीच्या अपिलानुसार सोमवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

चिपळूण न.प.ने शासनाच्या परिपत्रक सूचनेनुसार घनकचरा नियोजनात कराच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष तातडीची सभा काही महिन्यांपूर्वी घेतली. या सभेत सर्वानुमते शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वाढीव कराची रक्कम न आकारण्याबाबत निर्णय घेतला.

या निर्णयाविरोधात माजी नगरसेवक मुकादम यांनी न.प. अधिनियम ३०८ नुसार संबंधित ठराव व वादग्रस्त वाढीव दराच्या निविदेसंदर्भातील निर्णय रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही विषयांसंदर्भात सोमवारी दुपारी ३ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी आयोजित केली आहे.

त्या संदर्भातील पत्र संबंधित तक्रारदार मुकादम यांच्यासह नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व अंतर्गत लेखा परीक्षक व लेखापाल यांना पाठविण्यात आले असून सुनावणी हजर राहण्याबाबत सूचीत करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here