‘आरटीई’ प्रवेशाचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाला. त्यामुळे पुढील वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे पुढील शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आरटीईची पहिली सोडत ८ आणि ९ मार्च दरम्यान होणार आहेत. या प्रवेशासाठी १ फेब्रुवारीपासून पालकांना अर्ज करता येणार आहेत.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये समाजातील दुर्बल व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता २५ टक्के जागा राखीव आहेत. राज्यातील शाळांमध्ये या जागांवर प्रवेश देण्यासाठी शिक्षण संचालनालयाच्या वतीने वेळापत्रक जाहीर केले आहे.

शाळांमधील उपलब्ध जागांसंदर्भातील नोंदणी २८ डिसेंबर ते १७ जानेवारीदरम्यान होणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत जिल्ह्यात ९५ शाळांमध्ये ९६ हजार ८६४
जागा होत्या. या जागांसाठी ८११ बालकांचे अर्ज आले होते. यापैकी ६०९ बालकांनी प्रवेश निश्चित केला. त्यातील ५५१ बालकांचे शाळांत प्रवेश घेतले तर ३१३ जागा रिक्त राहिल्या आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार संचालनालय स्तरावरून बदल करण्यात येतील.

यासाठी राज्यात एकदाच लॉटरी काढण्यात येणार असून, शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे.

◼️ संभाव्य वेळापत्रक

पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे – १ ते २८ फेब्रुवारी २०२२

सोडत काढणे -८ आणि ९ मार्च २०२२

कागदपत्रांची पडताळणी, तात्पुरता प्रवेश – १० ते ३१ मार्च २०२२

प्रतीक्षा यादी टप्पा १:१ ते ७ एप्रिल २०२२ प्रतीक्षा यादी, टप्पा २:११ ते १९ एप्रिल २०२२ प्रतीक्षा यादी, टप्पा ३ : २५ ते २९ एप्रिल २०२२ प्रतिक्षा यादी, टप्पा ४:२ ते ९ मे २०२२

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here