उदय सामंत यांना वाढदिवसाची १५० कोटींची भेट…

0

रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी रत्नागिरीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विकास योजनांसाठी निधीची खैरात केली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल १५० कोटींची भेट देत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले. नियोजित मिऱ्या बंधाऱ्या सोबतच रत्नागिरीच्या प्रशासकीय इमारतीला ४० कोटी, मिऱ्या बंधारा सुशोभीकरणासाठी ४५ कोटी व जिल्हापरिषद इमारतीसाठी ४९ कोटी देत असल्याची घोषणा ना. अजित पवार यांनी केली. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत या कामासाठी देखील ७० कोटी देण्याचे काबुल केले.

मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते रविवारी झाले. यावेळी ते म्हणाले कि, मिऱ्या येथे साडेतीन किलोमीटर लांबीचा टेट्रापॉड बंधारा बांधला जात आहे. सात ठिकाणी ग्रोयन पद्धतीचा धूपप्रतिबंधक बंधारा असून चार किलोमितल लांबीचा रस्ता होणार आहे. बंधाऱ्यामुळे किनाऱ्याची धूप थांबणार आहे, गावाचे संरक्षण होणार आहे. मिऱ्या ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी हा बंधारा उभारला जात असून पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने मुंबई मरीन ड्राईव्ह प्रमाणे सुशोभीकरण करण्यासाठी ३० कोटी रुपयांचा जादा निधी येत्या अर्थसंकल्पात दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here