गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘शेअर बाजार आणि गुंतवणूक व्यवस्थापन’ प्रमाणपत्र कोर्स

0

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अर्थार्जनाचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत ‘शेअर बाजार आणि गुंतवणूक व्यवस्थापन’ या एक महिना कालावधीच्या प्रमाणपत्र कोर्स सुरू केला होता. या कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम महाविद्यालयात झाला.

समन्वयक डॉ. आर. ए. सरतापे यांनी प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यामागील उद्देश सांगितला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी या कोर्समधून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात आपल्या अर्थार्जनाचा मार्ग म्हणून करावा, असे आवाहन केले.

शेअर मार्केट विश्लेषक चिन्मय पित्रे आणि प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, महाविद्यालयातील प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्सेसचे समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे उपस्थित होते. डॉ. माश्रणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सूर्यकांत माने यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here