दापोली नगरपंचायतीच्या 4 प्रभागांची निवडणूक जाहीर

0

दापोली : दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्याची सुरवात ४ प्रभागातील आरक्षण सोडतीने करण्यात आली.

गेल्या २१ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीकरिता हे चार प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित होते.

मात्र इतर मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण तूर्त रद्द झाल्यामुळे तेथील निवडणुका सर्वसाधारण उमेदवारांसाठी होणार आहेत. त्यानुसार या ४ प्रभागांसाठी २९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२२ या काळात ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. त्याची प्रिंट काढून ती ३ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. अर्जांची छाननी ४ जानेवारीला होणार असून १० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १८ जानेवारीला सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार असून १९ जानेवारीला सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here