गृहमंत्री शहा यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशात आले असताना राजधानी दिल्लीत दंगल होतेच कशी? असा सवाल उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक व विरोधकांमध्ये सोमवारी हिंसाचार झाला होता. त्यावर सुप्रिया सुळे बोलत होत्या. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी ? असे खडेबोल सुळे यांनी सुनावले. तर, डॉ. नरेंद्र दाभोलकर आज आपल्यात नाहीत याची पोकळी सातत्याने जाणवत आहे. दाभोलकरांनंतर याविरोधात काम करण्यात आम्ही कमी पडत आहोत की काय, असे वाटत आहे. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here