विधान परिषदेतून सदस्यांची निवृत्ती, फोटो काढताना रामदास कदमांची गैरहजेरी

0

◼️ मंत्री अनिल परब यांच्यासोबत फोटो काढायला नको म्हणून रामदास कदम गैरहजर?

मुंबई : आज विधान परिषदेतून सहा सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना निरोप देण्यात आल्यानंतर विधान भवनाच्या पायरीवर फोटो काढण्यात आले.

मात्र, फोटो काढताना सहा सदस्यांपैकी दोन सदस्य गैरहजर राहिले. एक म्हणजे काँग्रेस नेते भाई जगताप आणि दुसरे शिवसेना नेते रामदास कदम. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर फोटो काढायला नको म्हणून रामदास कदम गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही भाईंनी फोटो काढताना दांडी मारल्याने त्याचीच अधिक चर्चा रंगली होती.

आज विधान परिषदेतून भाई जगताप, रामदास कदम, वरुणकाका जगताप, गिरीष व्यास, गोपीचंद बजोरीया आणि प्रशांत परिचारक हे सहा सदस्य निवृत्त झाले. विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांसाठी विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांच्या बरोबर विधीमंडळाच्या कामकाजाची आठवण म्हणून फोटो काढला जातो. पण हा फोटो काढते वेळी रामदास कदम आणि भाई जगताप हे अनुपस्थित राहिले. अनिल परब यांच्या बरोबर फोटो काढला जाऊ नये म्हणून रामदास कदम हे अनुपस्थित राहिले अशी चर्चा सुरू आहे. याचवेळी भाई जगताप यांनी अनुपस्थित राहून कोणाबद्दल नाराजी व्यक्त केली असा सवाल केला जात आहे. मात्र, दोन्ही भाई अनुपस्थित राहिल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 27-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here