कोकणातील कृषी क्षेत्रात ड्रोनचा होणार वापर

0

रत्नागिरी : अवकाळी पाऊस, अतीवृष्टी आणि अन्य नैसर्गिक समस्यांमध्ये तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि दोन्ही हंगामात हवामानाच्या अंदाजावर आखावी लागणारी शेतीचा आराखडा त्वरित अमलात आणण्यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कोकणातील प्रयोगशील शेतकर्‍यांना ड्रोनच्या हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने काही नियमावली जारी केली आहे. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकर्‍यांना ड्रोन कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  यासाठी कोकण कृषी विद्यापीठात नव्या तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता करण्यात येणार आहे तसेच शेतीसाठी ड्रोन किती महत्वाचे आहे याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ड्रोनच्या वापराने खरीपात पीकस्थिती, पीकपाहणी, किड रोग निर्मूलन, किडींचे व्यवस्थपान आदी कामे सुलभ होणार आहेत. पिकावर असलेली कीड आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रोनच्या हाय डेफिनिशन कॅमेरा मुळे सहज पाहायला  मिळणार आहे. किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात औषधे वापरता येणार आहेत  ड्रोन च्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत औषधे फवारणी होणार आहे. जास्त उंचीवरून फवारणी केल्याने सगळीकडे समान फवारणी होणार आहे. बागयती क्षेत्रात हे तत्र अवलंबिणे शक्य होणार आहे.

ड्रोनचा वापर करून आपण मोठ्या क्षमतेने किटकांवर फवारणी करू शकणार आहे. पिकांची जोपासना तसेच त्यावर काही दुष्परिणाम तरी होणार नाहीत ना याची काळजी कृषी  मंत्रालय घेत आहे. पीक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा किती आहे तसेच फ्लाय क्लीअरन्स, नोंदणी, सुरक्षा विमा अशा हंगामी परिस्थितीचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. ज्यावेळी ड्रोन उडवायचे आहे किंवा खाली घ्यायचे आहे. यावेळी सुद्धा काळजी घ्यावी लागते. अशी नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. या बाबत आता कोकणातील शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला प्रशिक्षण केंद्र या बाबत प्रशिक्षण करण्यात येणार आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 28-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here