पालपेणेतील युवा कार्यकर्ता उमेश खैर यांचा रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव

0


गुहागर : तालुक्यातील पालपेणे येथील उमेश खैर यांचा अतिरिक्त पोलिस अधीक्षक देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात पोलिस पाटील यांची सभा आयोजित केली होती. यावेळी खैर यांचा सत्कार केला.


उमेश खैर यानी कोरोना काळात उत्तम कामगिरी बजावत सामाजिक उपक्रमात सदैव अग्रस्थानी राहिले आहेत. तसेच त्यांनी आजवर १५ वेळा रक्तदान केले आहे. अनेक रुग्णांच्या सेवेसाठी ते धावून जातात. तसेच पोलिस गाव दत्तक योजनेतून पोलिस बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करणे, कोरोना लसीकरणासाठी पुढाकार आदी अनेक कामांची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. उमेश घेर यांना मनीवाईजतर्फे कोव्हिड योद्धा आणि आता जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here