दिल्लीत ‘यलो अलर्ट’; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

0

नवी दिल्ली : पूर्णपणे कोरोनाच्या छायेत गेलेले २०२१ हे वर्ष संपून २०२२ ची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे. देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. या विषाणूचे एकाच दिवसात इतक्या प्रमाणात नवे रुग्ण सापडण्याची घटना भारतात पहिल्यांदाच घडली आहे.

ओमायक्रॉनच्या बाधितांची एकूण संख्या ५७८ वर पोहोचली असून, त्यातील १५१ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली. या विषाणूचा १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रसार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिल्लीत झपाट्याने वाढत असल्याने केजरीवाल सरकारने हे पाऊल उचलले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे ‘दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान’नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. तसेच दिल्लीत काही गोष्टींवर बंदी घातली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात जाण्याची गरज नसली, ऑक्सिजन नाही, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज नाही, तर ओमायक्रॉन संक्रमित लोक घरीच बरे होत आहेत, असं केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे आहेत निर्बंध

  • रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
  • शाळा, महिवाद्यालय बंद राहणार.
  • थिएटर्स, मल्टिप्लेक्स, बँक्वेट हॉल, स्पा, जिम आणि मनोरंजन पार्क बंद राहतील.
  • दुकाने आणि वस्तू सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील.
  • आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त ५०% दुकानदारांना परवानगी असेल.
  • मेट्रो आणि बसेस ५०% क्षमतेने धावतील.
  • रेस्टॉरंट्स ५०% क्षमतेसह सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडतील.
  • ५०% क्षमतेसह बार दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडतील.
  • सलून उघडता येतील.
  • लग्न समारंभात फक्त २० लोकांनाच परवानगी असेल.
  • धार्मिक स्थळे खुली राहतील मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे.
  • सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा उपक्रमांवर बंदी.

दरम्यान, जगातील इतर देशांबरोबरच भारतामध्येही ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील १९ राज्यांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. तसेच जगभरात तब्बल ११६ देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 28-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here