कोरोना: ‘डॉ. आंबेडकरांचा पुतळा बनविण्याचे कंत्राट चिनी कंपनीकडून काढून घ्या’

0

मुंबई: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या चीनमध्ये हाहा:कार उडाला आहे. आतापर्यंत चीनमधील हजारपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आता इंदू मिलमधील नियोजित स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चिनी कंपनीकडून बनवून घेऊ नये, अशी मागणी पुढे आली आहे. त्याऐवजी हे कंत्राट एखाद्या भारतीय कंपनीला द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. चीनच्या वुहान आणि हुबेई प्रांतात सध्या कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चीनमधील व्यापार आणि कामकाज ठप्प झाले आहे. ही सगळी परिस्थिती पाहता इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनविण्याचे काम चिनी कंपनीकडून काढून घेण्यात यावे, अशी सूचना राहुल शेवाळे यांनी स्मारक परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत केली. या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारी, शिल्पकार अनिल सुतार, प्रकल्प सल्लागार शहापुरजी पालनजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here