रत्नागिरी पोलिसांनी दिलेला शब्द पाळला…

0

रत्नागिरीतील मोबाईल विक्रेते मनोहर ढेकणे यांच्यावर हल्ला करणारा नामचीन आरोपी सचिन जुमनाळकर याला अवघ्या काही तासातच रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेऊन आपला लौकिक कायम ठेवला आहे. घटना घडल्यावर आरोपी पळून गेल्यावर ढेकणे कुटुंबीय अधिक चिंतेत होते. या आरोपीकडून पुन्हा हल्ला होण्याची भीती त्यांना सतावत होती. मात्र अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळू असा शब्द रत्नागिरी पोलिसांनी ढेकणे कुटुंबियांना दिला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विजापूर येथे पोलीस पथक पाठवले. काहीही करून आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय परतू नका असाच आदेश या पथकाला देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी असणारा १ किलोमीटरचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. गावाच्या बाहेर जाणार्या सर्व रस्त्यांवर नजर ठेवण्यात आली. दरम्यान गावातून येणाऱ्या रस्त्यावरून ३ इसम पल्सर वरून येताना दिसले. पोलीस पथकातील एका कर्मचाऱ्याने आरोपीला क्षणात ओळखले. आरोपी पळून जात असताना पाठलाग करून या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरची कामगिरी ही डॉ. प्रविण मुंढे पोलीस अधीक्षक, श्री. विशाल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिरीष सासने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. सुभाष माने, पोहेकॉ संजीप कोळंबेकर, नितीन डोमणे, विजय आंबेकर, उत्तम सासवे, दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here