चांगले गटार तोडून पुन्हा नवीन गटार बांधण्याचा फार्स?

0

रत्नागिरीतील तेली आळी येथील तळ्याच्या समोरील बाजूचे अत्यंत सुस्थितीत असणाऱ्या गटाराचे पुनर्बंधाकाम करण्याच्या कामाला नगरपालिकेने सुरुवात केली असून हि बाब येथील नागरिक सचिन लांजेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी या सबंधी रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी कळवले आहे. सदरचे गटार अत्यंत सुस्थितीत असून ते पाडून नवीन गटार बांधणे हे नागरिकांच्या पैशाचे नुकसान आहे. गटार सुस्थितीत असताना त्याच्या पुनर्बांधणीसाठी नगरपालिकेचे इंजिनिअर यांनी परवानगी कशी दिली ? असा प्रश्न सचिन लांजेकर यांनी उपस्थित केला आहे. सचिन लांजेकर यांच्या अर्जाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी सदरचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here