स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रत्नागिरी कारागृह येथील कोठडी पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली. सुरक्षेच्या कारणास्तव ही कोठडी नागरिकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली होती. मात्र ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे आज ही कोठडी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात अली आहे. यापुढे देखील ही कोठडी नागरिकांना पाहण्यासाठी खुली रहावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

