शिव परिसरात अज्ञाताकडून महिलेवर प्राणघातक हल्ला

0

खेड : तालुक्यातील शिव बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. बेशुद्धावस्थेत सापडलेल्या या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.

IMG-20220514-WA0009

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिव बुद्रुक गावातील महाडिक वाडीमध्ये राहणारी यशोदा शांताराम महाडिक ही महिला बुधवारी २९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास गावातील बौद्धवाडीमार्गे मोहल्ला येथे निर्जन रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला. यावेळी तिला मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल वपर्समधील रोख रक्कम हल्लेखोरांनी काढून घेतली व तिला जखमी अवस्थेत रस्त्याकडेला सोडून हल्लेखोरांनी पोबारा केला.

या घटनेची माहिती काही ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 30-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here