विधानसभा अध्यक्षांची निवडणूक कोणी पुढे ढकलली?; खुद्द शरद पवारांनीच सांगितलं राजकारण

0

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राजभवन संघर्ष टोकाला पोहोचला होता.
दोघांमध्ये घटनात्मक अधिकारांवरून निर्माण झालेल्या वादात ही निवडणूक अडली. अखेर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीशिवाय हिवाळी अधिवेशन पार पडलं. आता, पुढील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. यासंबंधित प्रश्नावरुन आता खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सोमवारी दिवसभर वेगवान हालचाली झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र पाठवून अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी घेण्याचे स्पष्ट संकेत दिले. अध्यक्ष निवडीवरून दोघे पुन्हा आमनेसामने आल्याचं दिसून आलं. गुप्त मतदानाला मूठमाती देऊन आवाजी मतदानाने निवडणूक घेणे हे घटनाबाह्य ठरेल, असा इशारा देणारे पत्र राज्यपालांनी सरकारकडे दुपारी पाठविले. निवडीच्या कार्यक्रमास राज्यपालांची अनुमती सरकारने प्रस्तावाद्वारे मागितली होती. अधिवेशन मंगळवारी संपत होते. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यपालांनी ही अनुमती दिली नसल्याने अखेर ही निवड झालीच नाही. महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्याच सल्ल्यावरुन ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा होती. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलंय. आता स्पष्ट झालं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंगळवारीही पेचप्रसंग होता. मात्र, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली, यामागे शरद पवारांचा हात असल्याची चर्चा होती. पण, महाराष्ट्रात काहीही घडलं की यामागे शरद पवारांचा हात आहे, अशी चर्चा रंगते. माझा हात फार लांब आणि तो कुठेही जातो, असं दिसतंय, असे पवार यांनी म्हटले. तसेच, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. पण, असं करा, किंवा तसं करा, असे मी म्हटलो नाही, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. एका मुलाखतीदरम्यान, विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 30-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here