ब्रेकिंग : नितेश राणेंना दुसरा धक्का, आता सहकार विभागाकडून कारवाईचा बडगा

0

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. एकीकडे अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असताना दुसरीकडे सहकार विभागाने नितेश राणे यांच्यावर कारवाई केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच भाजप प्रणित पॅनलला मोठा धक्का सहकार विभागाने दिला आहे. या निवडणुकीसाठी आमदार नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून १६ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणे यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे.

नितेश राणे हे जिल्हा बँकेचे १६ कोटी रुपयांचे थकित कर्जदार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत भाजपप्रणीत पॅनल लढत असताना दुसऱ्या बाजूला आमदार नितेश राणे हे थकित कर्जदार असल्याने त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला आहे.

आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होत असून ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी केली आहे. भाजपाने देखील या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे. परंतु भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आमदार नितेश राणे ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्ज रुपी घेतलेले १६ कोटी रुपयांची परतफेड केली नसलयामुळे सहकार विभागाने नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. भाजपकडून जिल्हा बँकेसाठी उमेदवार म्हणून नितेश राणेंचे नाव चर्चेत होते. मात्र नितेश राणे यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने केंद्रीय मंत्री राणेंना व भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 30-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here