अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, आता नितेश राणेंसमोरील पर्याय काय ?; वकिलांनी दिली माहिती

0

सिंधुदुर्ग : संतोष परब मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन गुरुवारी अर्ज फेटाळून लावला आहे.

त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. दरम्यान, याप्रकरणी आमच्यापुढे हायकोर्टात जाणे हा पर्याय आहे. आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. त्यामुळे हायकोर्टात जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार नसल्याची माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी दिली आहे.

त्यामुळे आता जामिनासाठी नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्नीसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर नितेश राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई हे निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अॅड. संग्राम देसाई यांनी नारायण राणे यांची भेट घेत त्यांना कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यावेळी उद्या मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं. त्यानंतर नारायण राणे हे पत्नीसह मुंबईकडे रवाना झाले. तर देसाई हे आज मुंबईला जाणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात संग्राम देसाई यांच्यासह अजून काही ज्येष्ठ वकील नितेश राणे यांची बाजू मांडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 31-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here