ब्रेकिंग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सुरुवात; महाविकासआघाडीला धक्का, सतीश सावंत पराभूत

0

सिंधुदुर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीपासूनच महाविकासआघाडी आणि राणे समर्थक पॅनल्समध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. यावेळी एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११५ महिला व ८५३पुरुषांचा समावेश होता. ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे आठ टेबल मांडण्यात आली असुन आठ फेरीत मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये वैभववाडी विकास सोसासटीमध्ये दिलीप रावराणे यांचा विजय झाला आहे. तर सावंतवाडीत शिवसेनेचे विद्याधर परब विजयी झाले आहेत. याशिवाय, संतोष परब हल्लाप्रकरणात आरोपी असलेले वेंगुर्ला तालुका प्रमुख मनिष दळवी हेदेखील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल सतीश सावंत यांच्या, तर भाजपचे सिद्धिविनायक पॅनेल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे.

* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेबाहेर राणे समर्थकांची जोरदार घोषणबाजी
* राणेसमर्थक सिद्धिविनायक पॅनलला ७ जागांवर विजय, तर महाविकासआघाडीच्या पॅनलला ५ जागा
* कणकवलीमधून सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं. समसमान मतं पडल्यानंतर चिठ्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष होते.
* एकूण १९ जागांपैकी प्रत्येकी चार-चार जागांवर महाविकासआघाडी आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय
* महाविकासआघाडीला मोठा धक्का, विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, भाजपच्या विठ्ठल देसाई यांचा विजय
* मालवणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी
* कुडाळमधून काँग्रेसचे विद्याप्रसाद बांडेकर विजयी
* दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई यांचा विजय* वेंगुर्ला तालुका प्रमुख मनिष दळवी यांचा विजय
* सावंतवाडीत शिवसेनेचे विद्याधर परब विजयी
* वैभववाडी विकास सोसासटीमध्ये दिलीप रावराणे यांचा विजय

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 31-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here