ब्रेकिंग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 10 जागा जिंकल्या

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत.

अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे. आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 पैकी 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 5 जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तेली पराभूत

या निवडणुकीत भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांचा सुशांत नाईक यांनी पराभव केला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

खणखणीत नाणे, नारायण राणे

भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तर काही जणांनी नितेश राणेंचे फोटोही व्हायरल केले आहे. या फोटोवर गाडलाच असं लिहिलं आहे.

निकाल काय?

भाजपचे प्रकाश बोडस विजयी
भाजपचे दिलीप रावराणे विजयी
भाजपचे मनीष दळवी विजयी
भाजपचे महेश सारंग विजयी
भाजपचे अतुल काळसेकर विजयी
भाजपचे विठ्ठल देसाई विजयी
भाजपचे बाबा परब विजयी
भाजपचे समीर सावंत विजयी
भाजपचे गजानन गावडे विजयी

महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी
महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी
महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 31-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here