“शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपमध्ये ताकद नाही” – बच्चू कडू

0

विधानसभा अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव आणि काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदी आणावी या मागण्यांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशनाच्या या गदारोळावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपमध्ये ताकद नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. या मुद्द्यावरुन राजकारण करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये सर्व मुरलेले नेते आहेत. ते हा विषय योग्यरितेने हाताळतील. असं राजकारण करुन जनतेमध्ये गैरसमज न पसरवण्याचा सल्ला बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं आपल हिंदुत्व सोडलं आहे का? एवढी लाचार शिवसेना कधीच पाहिली नाही, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here