भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोलकातामधील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय वुडलँड्स येथे दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, आता त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे वृत्त आहे .
सौरव गांगुली यांना 3 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांना कोरोनावरील उपचारासाठी कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. या वर्षात गांगुलींना रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये त्यांना हृदयविकाराच्या समस्येमुळें बराच काळ रुग्णालयात राहावं लागलं होतं.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 31-Dec-21