लोकमान्य सोसायटीतर्फे साखरपा येथे आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

साखरपा : येथील लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साखरपा शाखेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त हे शिबिर झाले. सामाजिक बांधिलकीच्या हेतूने हा रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात आला.

श्री दत्त देवस्थान, कोंडगाव आणि वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेतले. या शिबिरात २९ लोकांनी रक्तदान केले. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या साखरपा शाखेच्या व्यवस्थापक मेघना शहाणे, कर्मचारी संदेश लिंगायत, जितेंद्र किर्वे, सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक लक्ष्मीकांत खेडेकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 31-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here