खेड शहरातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

खेड : काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी नुकताच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.

खेड शहरात नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात किरण तायडे, अरबाज बडे, कैस लासने, उबेद परकार, सउद तांबे, शैलेश शिगवण, सुजित तायडे, सुहेल सिद्दीकी, बुरान बडे, सिमप जमादार, सुरेंद्र तांबे, आकिब बडे, मुजाहीद बडे, मोहिद्दीन बडे, सलमान रावळ आदींनी प्रवेश केला. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये हिरमोड होणार नाही. त्यांना सन्मानाची वागणूक मिळणार याची खात्री बाळगावी. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे. सर्व पदाधिकारी मिळून आपण कार्यकर्त्यांना बळ देऊ. यावेळी गौस खतीब, अनिल सदरे यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 31-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here