धन्वंतरी रुग्णालयात रविवारी वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर

0

रत्नागिरी  येथील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅ ण्ड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी (दि. १ मार्च) दुपारी २ पासून वंध्यत्वावर धन्वंतरी रुग्णालयात मार्गदर्शन आणि मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. वंध्यत्व निवारणासाठी निपुत्रिक जोडप्यांना मार्गदर्शन दर महिन्याच्या पहिल्या रविवारी केले जाते.शिबिरात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची मोफत तपासणी करतात. टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास उपलब्ध पर्यायांची माहिती देतात. गर्भनलिका जोडणे, स्त्रीबीज तयार न होणे आणि न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, गर्भ रुजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, पुरुषांमध्ये असलेली शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी असणे, तसेच सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे शिबिरात मार्गदर्शन करतात. रविवारी होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (०२३५२) २२१२८२ किंवा ९५२७०४४९०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here