लोटेत दीपक नोव्हा केम कंपनीत वायुगळती; १ कामगार जखमी

0

खेड (प्रतिनिधी): लोटे एमआयडीसीमधील दीपक नोव्हा केम कंपनीत बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास फिनोल वायूची गळती झाल्याने एक कामगार जखमी झाला. त्याला चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला सांगली येथे हलवण्यात आले आहे. अक्षय अरविंद खापरे २२ रा, पिरलोटे असे त्या जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. ठेका पद्धतीने काम करत असलेली अक्षयं ही कामगार रात्रपाळीची सेवा बजावत होता. अचानक प्लांट मधील फिनोल वायू गळती झाली व त्यातील काही थेंब अक्षय याच्या चेह-यावर उडाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मञ प्रकृती चिंताजनक बनाने त्याच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here