उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू

0

कोकण रेल्वेच्या धडकेत उक्षी (ता. संगमेश्वर) येथे जखमी झालेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी पुलावर दोन दिवसांपूर्वी रात्री ही घटना घडली होती. उक्षी येथे गाडीसमोर आलेल्या बिबट्याला रात्री उशिरा गाडीची धडक बसून बिबट्या मार्गावर फेकला गेला. तो जखमी अवस्थेत तेथेच पडून होता. या घटनेमुळे ८ मिनिटे रेल्वेची वाहतूक थांबली. रेल्वेच्या मोटरमनने याची माहिती उक्षी रेल्वे स्थानकात दिली. रेल्वेने जिल्ह्याच्या वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाने जखमी बिबट्याला ताब्यात घेतले आणि उपचार सुरू केले. मात्र गाडीच्या धडकेत बिबट्याचा मागचा पाय आणि शेपटी तुटून गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here