रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी देवस्थानच्या शिमगोत्सवाचा कार्यक्रम जाहीर

0

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाचा कार्यक्रम जाहीर झाला. वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घेण्यात आली. या वेळी गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मंजूर झालेल्या कार्यक्रमानुसार ९ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेला रात्री दहा वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव व ग्रामस्थ मंडळी झाडगावच्या सहाणेवरून महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात जातील आणि कार्यक्रमाला रीतसर सुरुवात होईल. मंगळवारी दुपारी झाडगाव येथे सहाणेवर होळी उभी केली जाईल, रात्री नऊ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरून निघेल. गुरुवार १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरून उठेल. रात्री साधारण दहा वाजता झाडगाव सहाणेवर येईल. त्यानंतर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी १३ मार्च रोजी रंगपंचमी आहे. या दिवशी भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजता सहाणेवरुन उठेल. त्यानंतर परंपरेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्रसलामी घेऊन श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर, श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिर, शहर पोलीस ठाणे, धनजी नाका, राधाकृष्ण नाका मार्गे राम नाका, राम मंदिर, मारुती आळी, गोखले नाका मार्गाने पालखी ढमालणीच्या पारावर रात्री नऊ वाजता येईल. तेथून पुढे विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर येथे रात्री दहा वाजता, खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत येईल. रात्री बारा वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल. नंतर शिमगोत्सवाची सांगता होईल.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here