अन्न व औषध प्रशासन विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) कायदा २००३, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चा प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती व दूध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेतला. यावेळी सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन द. मा. बांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. गुंजाळ, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून लिकर/दारुचे नमुने घ्या, तसेच अप्रमाणित नमुन्यांबाबत कारवाई करा आणि त्याचा अहवाल द्या, अशा सूचना केल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 01-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here