‘त्या’ महिलेच्या हल्लेखोरांचा शोध सुरू

0

खेड : तालुक्यातील शिव बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवार दि. २९ रोजी दुपारच्या दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हलेखोरांनी एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिव बुद्रुक गावातील महाडिक वाडीमध्ये राहणारी यशोदा शांताराम महाडिक ही महिला बुधवारी दि. २९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास गावातील बौद्धवाडी मार्गे मोहल्ला येथे निर्जन रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमानी तिच्यावर हल्ला केला. यावेळी तिला मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन, मोबाइल व पर्समधील रोख रक्कम हल्लेखोरांनी काढून घेतली व तिला जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून हल्लेखोर निघून गेले. या घटनेची माहिती काही ग्रामस्थांना मिळाल्या नंतर त्यांनी पोलीसाना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोचून जखमी महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:41 PM 01-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here