रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ८८ शाळांची बिले थकीत राहिल्याने वीज जोडणी महावितरणकडून तोडण्यात आली आहेत. बिले भरण्यासाठी पुरेसा निधीच जमा न झाल्यामुळे ही वेळ आली आहे. ही बिले ग्रामपंचायतींनी स्वनिधी भरावीत, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींना स्व उत्पन्न नसल्यामुळे आधीच अडचणीत आहेत, त्यात शाळांची बिले भरण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. मंडणगड-५, दापोली-३२, खेड-१०, चिपळूण-२, गुहागर-८, संगमेश्वर-७, रत्नागिरी-०, लांजा-२०, राजापूर-४ अशाप्रकारे जोडणी तोडलेल्या शाळांची संख्या आहे.
