चिपळुणात ३ व ४ जानेवारीला वयोवृद्ध व दिव्यांग पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत शिबीर

0

चिपळूण : केंद्र शासनाच्या वयोश्री व एडिप योजनेंतर्गत चिपळूर तालुक्यातील ६० वर्षावरील वयोवृद्ध व दिव्यांग (४० टक्के व्यंग असणारे) पात्र लाभार्थ्यांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे मोफत वाटप पुर्व तपासणी शिबीर दि. ३ व ४ जानेवारी २०२२ रोजी शहरातील काविळतळी येथील बांदल हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन खा. श्री. विनायक राऊत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दि. ३ जानेवारीला सकाळी १० वाजता होणार आहे.

चिपळूण पंचायत समिती व तालुका आरोग्य विभागामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खा. विनायक राऊत यांनी या शिबिरासाठी विशेष प्रयत्न केले. या शिबिराच्या उद्घाटन सोहोळ्याला खा. श्री. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, चिपळूण पंचायत समिती सभापती सौ. रिया कांबळे, उपसभापती प्रताप शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसिलदार जयराज सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.

सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी आर्थिकदृष्ट्या मागास ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तर मंगळवार दि. ४ जानेवारी २०२२ रोजी दिव्यांग याच्यासाठी हे शिबीर होणार आहे. एडिप योजनेंतर्गत दिव्यांगांना अस्थिव्यंगासाठी-कॅलीपर्स, व्हिलचेअर, कुबड्या, यल्बो क्रचेस, रोलेटर, वॉकिंग स्टीक, सेरेब्रेल पालसीसाठी सी.पी.चेअर, अंधासाठी-डेसीप्लेअर, स्मार्टफोन, स्मार्ट केम, ब्रेन केम, ब्रेल स्लेट, ब्रेल कीट, कर्णबधीरांसाठी-श्रवणयंत्र, १८ वर्षाखालील मतीमंदासाठी एमएसआयईडी कीट, कुष्ठरोग बाधितांसाठी एडीएल किड, कृत्रिम अवयवांमध्ये हात व पाय तपासणी होऊन आवश्यकतेनुसार नोंदणी होणार आहे.

शिबिराला येण्यापुर्वी आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत स्थरावर सीएससी केंद्रावर जाऊन ग्रामसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी पात्र लाभार्थ्यांची रेशनकार्ड, आधारकार्ड, फोटो, १लाख ८० हजार पेक्षा कमी उत्पन्नाची नोंद असलेले रेशनकार्ड झेरॉक्स, स्वाक्षरी, ४० टक्केवरील अपंग प्रमाणपत्र स्कॅन करून खालील एलिम्कोच्या लिंकवर अपलोड करून नोंदणी करून नोंदणी क्रमांक यादीसहीत लाभार्थ्यांना तपासणी शिबिराला आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:13 PM 01-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here