आगार व्यवस्थापकांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

0

मंडणगड : मंडणगड आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांना मी शासकीय अधिकारी आहे, असल्याचे सांगून धमकावणारा विनोद भोजू राठोड याच्याविरोधात मंडणगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी तोतयेगिरी करणाऱ्या या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात हनुमंत फडतरे यांनी मंडणगड पोलिस स्थानकात ३० डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जातील माहितीनुसार ३० डिसेंबर २०२१ रोजी आरोपीत विनोद भोजू राठोड हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंडणगड आगारात दाखल झाला. आगार व्यवस्थापकांची भेट घेत मी दापोली येथील महसूल अधिकारी असून मंडणगड आगाराच्या चौकशीकरिता आलो आहे, असे सांगितले. आगारातील किती कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे, ही माहिती विचारीत केलेली कारवाई ही चुकीची असून आगाराचा व विभाग नियंत्रक यांचा अहवाल मी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले. आगार व्यवस्थापकांना सदर व्यक्तींचा संशय आल्याने त्यांनी आरोपीकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने आगार व्यवस्थापकांनी मंडणगड पोलिसांच्या ताब्यात दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 03-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here