विनामास्क फळ विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : कोरोना काळात तोंडाला मास्क न लावता हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी फळ विक्रेत्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वा. चर्मालय ते मारुती मंदिर रस्त्यावरील नावकर प्लाझाजवळ करण्यात आली. लक्ष्मण भागवत कुंडकर (२८, रा. तेलीआळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फळ विक्रेत्याचे नाव आहे.

शुक्रवारी सायंकाळी तो कोरोना काळात नावकर प्लाझा येथे रस्त्याच्या बाजुला तोंडाला मास्क न लावता फळ विक्री करत होता. कोरोना काळात संसर्ग पसरण्याचा धोका असल्याचे माहित असतानाही त्याने हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार पाटील करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 03-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here