स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाच्या प्रस्तावावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकांच्या गौरवाचा प्रस्ताव आणल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, असे विधान नितेश राणे यांनी केले आहे.
