ग्रामपंचायतीत फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे लसीकरण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याच्या दृष्टीने सावधगिरीच्या आरोग्य उपायोजना करताना लसीकरणाला प्राधान्य देताना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीत आणि वसाहतीमध्ये फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे (एमव्हीसी- मोबाईल व्हॅक्सिनेशन सेंटर) लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्तरावर आणि वसाहतीच्या प्रवेश द्वारावर शंभरटक्के लसीकरण झाल्याचा फलक लावण्यात येणार आहे. दोन मात्रा घेतलेल्यांसाठी सर्व निबंध शिथिल केल्यानंतर नागरिकांचा लसीकरणाकडे ओघ वाढला होता. मात्र, आता पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली आहे. लसीकरण १०० टक्के झालेले नाही. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आता प्रशासन लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी फिरती लसीकरण केंद्रे तयार करण्यात येणार आहे. यासाठी खासगी संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. या केंद्राद्वारे ग्रामपंचायतीत जाऊन प्रभागस्तवार लसीकरण करण्यात येणार आहे.

ज्या समूहाने वसाहती असतील तेथे प्राधान्याने ही केंद्रे कार्यरत करण्यात येणार आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या आणि वसाहतींच्या प्रवेशद्वारावर शंभर टक्के लसीकरण असा फलक लावण्यात येणार आहे. दिवाळीआधी यासाठी प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीत ही मोहीम राबविण्यासाठी प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:07 PM 03-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here