मालवण आगाराला साडेसहा लाखांचे उत्पन्न; निमित्त आंगणेवाडी यात्रा

0

आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी प्रशासनाने भाविकांना चांगली सेवा दिली. शहरासह ग्रामीण भागातूनही भाविकांसाठी एसटी बसफेऱ्यांची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात्रोत्सव कालावधीत मालवण आगरातून विविध मार्गांवर ६९८ फेऱ्या मारण्यात आल्या. त्यातून ६ लाख ५७ हजार ९९१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे भाविकांनी एसटी सुविधेचा लाभ घेतला. एसटी आगाराच्या सर्व चालक, वाहकांनी भाविकांना चांगली सेवा दिली. काही चालकांनी एसटी सजावटीतून भाविकांना आकर्षित केले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने येथील एसटी आगाराने चोख नियोजन केले होते. दोन दिवसांच्या यात्रा कालावधीत आगारातून ६९८ बसफेऱ्या आंगणेवाडी यात्रेसाठी मारण्यात आल्या. यात ३८ हजार ६९९ प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार २२० रुपयांचे जादा उत्पन्न आगारास मिळाले, असेही बोधे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here